अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती दुर्गराज रायगड
शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे सदस्यत्व सुरू करण्याची इच्छा हजारो शिवभक्तांनी व्यक्त केली, त्याप्रमाणे पुढील सुविधा उपलब्ध करून दिली आहे. हजारो मावळ्यांच्या, सर्वसामान्यांच्या बलिदानातून महाराष्ट्रभूमी पावन झाली व स्वराज्याचेही स्वप्न साकार झाले. किल्ले रायगडवरती शिवरायांनी ‘राज्याभिषेका’च्या प्राचीन प्रथेला पुनर्जिवित करून ६ जून १६७४ रोजी स्वत:स मोठ्या वैभवात राज्याभिषेक करवून घेतला व एक सार्वभौम राज्य स्थापन झाल्याची द्वाही फिरवली.शिवराज्याभिषेकानंतरच ‘स्वराज्यास’ एक तात्त्विक बैठक मिळून शिवरायांनी चालविलेले उद्योग हे केवळ ‘मराठ्यांचे बंड’ नसून सार्वभौम राज्याची स्थापना आहे, हे या राज्याभिषेकाने सिध्द केले. शिवरायांनी त्यावेळच्या तरूणांना एकत्रित केले. त्यांना आश्वासक नेतृत्व देण्याबरोबरच त्यांची बलस्थाने ओळखून त्यांच्यावर योग्य त्या जबाबदाऱ्या सोपविल्या. त्याच ध्येय उद्देश्याने शिवराज्याभिषेक महोत्सव समिती कार्य करत आहे. समिती सोबत जोडून कार्य करण्यासाठी पुढील लिंक वरती आपली संपूर्ण माहिती भरावी.